या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

47) माझ्या पोटी यायचेस...

आत्ता माझ्या समोर सोडिलास अंतिम श्‍वास
हवी होतीच विश्रांती, तुझ्या विकल देहास
बुद्धीला हे पटे तरी मनास ते मानवेना
कसे काढावे आयुष्य आई आता तुझ्याविना?
प्रेमाची ही नातीगोती, अनुभवांची श्रीमंती
तुझ्यामुळेच मिळाली यश, कीर्ती, गुणसंपत्ती
माझ्याकडून तुझी गं, नाही सेवा घडली काही
मनातले प्रेम कधी ओठांवर आले नाही
तरी तुला होती ना गं त्याची आतून जाणीव
आता मात्र दरक्षणी तुझी भासेल उणीव
जिथे कुठे जाशिल तिथे रहा सुखात तू आई
तुझी-माझी जुळली नाळ कधी तुटायची नाही
पुढच्या जन्मी तू मुलगी माझ्या पोटी यायचेस
करीन मी तुझे लाड, कौतुकात न्हायचेस
वियोग हा तात्पुरता, बघ डोळे मी पुसले
आई, तुझ्या मुद्रेवर शांत हसू उमटले

- हेमलता धारवाडकर, पुणे.


मागील कविता वाचा

No comments:

Post a Comment