या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

45) झोप आली आई...


झोप आली आई, आवर लवकर काम
नको म्हणू सारखं "जरा थांब, जरा थाबं‘
तुझ्याविना मला, झोप मुळी येत नाही
नको ना गं हसू, दादा म्हणेल भागूबाई
अंगावरती जेव्हा, असतो तुझा हातदिसत नाही मला, बागुलबुवा काळोखात
गोष्ट ऐकता ऐकता, किती वाटते छान
मऊ मऊ मांडीवर, हळूच टेकते मान
केसांतून फिरतात, तुझी मऊशार बोटे
मायेचा तो स्पर्श, हवाहवासा वाटे
गालावर टेकतात, जेव्हा हळूच तुझे ओठ
न जेवतासुद्धा, माझे तृप्त भरते पोट
थांबायला आता मला, मुळी वेळ नाही
राहू दे ना काम सारं, झोप आली आई...

- मीना घळसासी, कऱ्हाड 

No comments:

Post a Comment