या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

44) मी माय पाहतोय...


फाटलेल्या लुगड्यात
शेतातील कापूस वेचताना
चुलीवर मांडलेल्या तव्यावर
हातांनी भाकरी थापताना
मी माय पाहतोय...
दुःखाचे हुंदके गिळताना
आसवांनी पदर भिजवताना
चंद्रमौळीत गोधडी टाकताना
कष्टांची टिपणं काढताना
मी माय पाहतोय...
वेदनांचे डोह पार करताना
डोईवरील पांढरे केस सावरताना
पाठीवर उबदार हात फिरवताना
पोराच्या स्वप्नांना ठिगळं लावताना...
माय मला पाहतेय...

- मो. ज. मुठाळ, अकोला 

No comments:

Post a Comment