या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

43) मी वेगळं काय करते ?

इथंही उगवतो दिवस रोज साडेपाचच्या भोंग्यानंतर...
तुझ्यासारखीच मीही उष्टी-खरकटी काढते...
परसदार अन्‌ अंगणातला केर-कचरा काढते...
फक्त, तू सुनं सोडायचीस अंगण
मी थोडीशी रांगोळी रेखाटते...
तुझ्यासारखीच मीही तव्यावर भाकरी भाजते
तू शिकवल्या होत्यास तशाच भाज्या रोज करते
जेवणाआधी तू पाहायचीसस वाट आंधळ्या फकिराची
इथं मी रोज गायीला घास घालते...
तुझ्यासारखीच चालते
तुझ्यासारखीच बोलते
तुझ्यासारखीच वागते
तुझ्यासारखीच राहते
सारं सारं काही तुझ्यासारखंच करते
फक्त तू सुन्या सोडलेल्या कपाळावर...
मी थोडंसं कुंकू रेखाटते...
मग, तूच सांग ना गं, माय
मी वेगळं काय करते ???

- शहनाज ऊर्फ शर्मिला गोसावी, नगर 

No comments:

Post a Comment