या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

42) धरणीमाय

माझी माय धरितरी कशी रापते उन्हात
मेघश्‍यामाच्या भेटीले, जशी राधा विरहात
आला वैशाखवणवा, माय झाली लाही लाही
डोये गाडून आकाशी, वाट सावळ्याची पाही
श्‍याम धावून येईल, चिंब न्हाऊन जाईल
माय धरितरी माझी, पुन्हा गरभार ऱ्हाईल
बळीराजा आनंदल, घाम गाळलं रानात
सोनं पिकवाया उद्या बीज पेरंल भुईत
तिची उजळंल कूस, बीज अंकुरंल पोटी
पान्हा पाजवील गाय, पुन्हा वासराच्या ओठी
घास भरवील चोची, वेडं पाखरू पिलांना
चंद्रकोरीची भाकर, आई देईल मुलांना
सारं शिवार सजल, माय हिरवं नेसल
काळी धरितरी माय, तिच्या पिलांना पोसल

- विवेक शीलवंत, पुणे 

No comments:

Post a Comment