या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

41) आई दिसली की

आई दिसली की -
ईश्‍वराचं मूर्त रूप साकार व्हायचं
अन्‌ अंतरात्मा फोटोग्राफर व्हायचा...!
आई रुसली की -
आपलं बोट धरून चालणारं जीवन
वाटायचं
यात्रेत हरवलेल्या अजाण मुलासारखं...
आई असली की -
दिवा नाही लावला तरी
उजेड कधी फितूर व्हायचा नाही
घराशी...अंगणाशी...
आई हसली की -
तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या
वाटायच्या
स्वर्गाचा प्रमाण-नकाशा!

- नजीम खान, चिखली (जि. बुलडाणा) 

No comments:

Post a Comment