या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

40) आई म्हणजे...


आई म्हणजे...
एक हात रांधणारा...
एक हात सांधणारा...
एक हात नातीगोती घट्ट बांधणारा
एक हात दमून आलेल्या धन्याच्या कपाळी हळुवार
एक हात कुशीतल्या बाळाच्या जावळात अलवार
एक हात पापणीआड आसू दडवणारा
एक हात अवघी आयुष्यं घडवणारा

- चारुता प्रभुदेसाई, पुणे 

No comments:

Post a Comment