या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

39) पायरी रिकामी ठेवून...


आई -
पायरी रिकामी ठेवून
तू निघून गेलीस, न परतणाऱ्या प्रवासाला...
अथांग सागरात वावरणाऱ्या जहाजांना
जसे दीपस्तंभ हवे असतात,
तसेच आयुष्यात चालताना प्रत्येकालाच
आधार हवे असतात...

तू गेलीस...
फक्त माझाच नाही, घराचाच आधारवड गेला
"माणसं हिरावून घेऊ शकतो,‘
असा उन्माद असतो नियतीला...
पण थरथरणारे मधाळ शब्द, जुळलेले सूर
मनाच्या गाभाऱ्यातून थोडेच नेता येतात?

तू गेलीस...
पण तू निवडलेली पायरी
असेल आमच्या साथीला कायमचीच
थबकतील क्षणभर आमची पावलं...
शेजारून जाताना
धक्‍क्‍याने कुपीतले अत्तराचे थेंब सांडावेत
तशा ठिबकतील काही आठवणी मनाच्या कुपीतून
निःशब्द राहिलो तरी...
निश्‍चितच होऊ क्षणभर सुगंधित
अगदी कळत, नकळत...!

- चं. बा. देशपांडे, पुणे 

मागील कविता वाचा


No comments:

Post a Comment