या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

38) पुनर्जन्म

माझ्या थकलेल्या पावलाखालच्या
भूमातेच्या मूठभर मातीकडे
माझ्या धवल ध्वजथारी मस्तकाने
शरणागती मागितली
तेव्हा तू म्हणालीस 
""वत्सा, माझ्या खऱ्याखुऱ्या प्रामाणिक
शरणार्थीला मी संजीवन देत असते
मात्र
लालबुंद देहावरील
अहंकाराच्या मनोहर वस्त्रांचा
त्याग करून आलेल्यांनाच...!‘‘
मी आनंदाने तरारलो
पुन्हा तुझ्याकडे आलो व म्हणालो 
""धरणीमाते,
दिगंबर असलो तरी दशदिशा वस्त्रे
त्यागून आलेलो आहे...
तू दिलेल्या आश्‍वासनामुळे नवजीवनासाठी
मी आसुसलेलो आहे...
तुझ्या गर्भात जन्म घेऊन
माझ्या हिरव्या हिरव्या कोंबाने
काळ्या आईच्या काळ्या खांद्यावर
स्वार होऊन
चिमुकल्या चक्षूच्या झरोक्‍यातून
पुन्हा एकदा निरखावे
माथ्यावरील निळेनिळेभोर
अनंत आकाश...‘‘

दिगंबर जोशी, पुणे 

मागील कविता वाचा

No comments:

Post a Comment