या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

२७)अाईची अाठवण

जीवनाची ज्योत आई विझली कशी ग ....
काळाशी भांडताना वदली कशी ग ||धृ||  
 
सोसुनि दुखाच्या कळा मला घडविले।        
पाडसापरी तूने ग मला वाढविले।        
सोडून गेली आई पाडसा जसी ग ||1||  

उरली नाही सीमा तुझ्या थोर सद्गुणाची        
आठवण येते तुझ्या केलेल्या ऋणाची        
रुसली का माझ्यावर बोलना मजसी ग||2||

होती आई जोवर होता सहारा।              
सुन्ना सुन्ना वाटे मजला आज हा निवारा
वेदना मनाच्या माझ्या काळजा उरी ग||3|

तुझ्या थोरविचि कथा गाउ किती मी          
कोणत्या दिशेला आई पाहू किती मी        
गाई गाणे दुखाची विजय अशी ग||4||

(सिनगारपुतळे विजय रावसाहेब, वि.मं. गुडेवाडी, ता. चंदगड)

No comments:

Post a Comment