या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

43) सर्वपित्री अमावस्या

असे म्हटले जाते की सर्वपित्री अमावस्येला अपवित्र जागी तसेच पाणवठ्या जवळ जाऊ नये. अशाच एका सर्वपित्री अमावस्येला झपाटलेल्या संजयची ही कहाणी.
“साले, मला जमिनीवर दाबत होते, स्वत:बरोबर घेऊन जात होते.”, भर उन्हात १२.३० - १.०० च्या सुमारास मैदानातून खेळून कपडे धुळीने माखलेल्या अवतारात बडबडत आणि शिव्या देत संजय घरी पोहोचला. त्याचा अवतार बघुन त्याच्या आईने त्याला आंघोळ करून मगच घरात यायला सांगितले. आल्या पावली स्वत:शीच बडबडत संजय घरामागील न्हाणीघराकडे निघाला. वाटेतच दीपकने म्हणजे त्याच्या मोठ्या भावाने त्याला टपरी वरुन सिगरेट आणायला सांगून १० रुपयांची नोट दिली. ती घेऊन संजय टपरीकडे निघाला. संजयचे विक्षिप्त वागणे पाहुन दीपकला थोडा संशय आला पण त्याने तिकडे दुर्लक्ष केले.
इकडे संजय टपरीवर जायला निघाला आणि समोर राहणारा नाम्या त्याला भेटला. त्याला बरोबर घेऊन भर दुपारी संजय पूर्ण बाजारपेठेत फिरत होता. कंटाळून नाम्याने घरी जातो म्हटले पण संजयने त्याला सोडले नाही आणि आपल्या बरोबर फिरवत राहिला. जवळ जवळ दोन तासानी ते दोघे घरी आले तेही सिगरेट ऐवजी लिंबू घेऊन. दीपक त्याच्यावर चिडलातसा संजय त्याला मारायला धावला. दीपकची बकोटी धरून त्याला बुकलायला लागला, हे पाहुन आजुबाजूचे शेजारी त्यांना सोडवायला धावले पण संजय ५-५ जणांना देखील आवरेना. सर्वाना शिव्या देऊ लागला हे पाहुन त्याच्या वडिलांना शंका आली आणि ८-१० लोकांनी धरुन संजयला दोरीने बांधले तेव्हा फार विचित्र हसत संजयच्या तोंडुन शब्द ऐकू आले, ‘याला आम्ही सोडणार नाही बरोबर घेउनच जाणार’. तिन ते चार जणांचे विकट हास्य ऐकू आले, ते ऐकताच सगळेच नाखशिखांत घाबरले. संजयच्या घरच्यांच्या लक्षात आले की त्याला पिशाच्चानी झपाटलय. आता काय करायचे असा विचार करत असतानाच संजयची विधवा मामी तिथे आली. तिचा संजय वर खुप जीव पण तिला बघताच संजय बेफाम झाला, पुन्हा घाणेरडया शिव्या देवू लागला. ‘ही पांढर्‍या कपाळाची इथे कशाला आली? हिला आत्ताच्या आत्ता हाकलुन दया’.
बिचारी मामी ते पाहुन हबकुनच गेली. तिला संजयची आई घरात घेऊन गेली तेव्हा कुठे संजय शांत झाला. संजयच्या वडिलांनी त्याच्या बरोबर मैदानात खेळायला गेलेल्या मुलांना विचारले, ‘नक्की काय झाले?’ तेव्हा त्या मुलांनी त्याना सांगितले की ते सगळे व्हॉलीबॉल खेळत होते. अचानक संजय कोणाशीतरी मारामारी करत असल्यासारखे जमिनीवर गडाबडा लोळु लागला आणि शिव्या देवू लागला, नंतर मग एकदम निपचित पडून राहिला. थोड्या वेळाने उठून घराकडे चालु लागला. त्याचा अवतार इतका भयानक होता की आम्हाला त्याला अडवण्याचे धाडसच झाले नाही.
हे सगळे ऐकल्यावर संजयच्या वडिलांनी वेळ न दवडता त्याला गाडीमध्ये घालून गाणगापुरला नेले. तिथे त्याला साखळीने बांधून ठेवले होते. तरीही तो कोणाला ऐकत नव्हता. सतत तोंडातून गुरगुर आवाज काढत होता. आपल्या मुलाची अवस्था बघून त्या बापाचे काळीज कळवळत होते पण असहायपणे त्याच्याकडे बघण्यावाचून तो बाप काही करू शकत नव्हता. नंतर तिथे भुत उतरवणाऱ्या माणसाने संजयला कसला तरी अंगारा लावला तसा संजय प्रचंड तळमळु लागला. तो बाबा कसले कसले मंत्र म्हणू लागला तसे संजय आणखीनच तडफडू लागला. त्या पिशाच्च आणि मांत्रिकाच्या लढाईत संजयचे शरीर पिळवटुन निघत होते. जवळ जवळ दोन तास हे सगळे सुरु होते. नंतर एक मोठी किंकाळी फोडून संजय निचेष्ट पडला. त्याच्या शरीरातील सर्व पिशाच्च एक - एक करून बाहेर पडले होते. बिचार्‍या संजयने खुप भोगले होते पण आता तो मुक्त झाला होता. त्या मांत्रिकाने सांगितले की, ‘तुम्ही वेळेवर याला इथे आणलेत म्हणुन हा वाचला नाही तर आज पिशाच्च याला घेउनच गेले असते’. संजयच्या गळ्यात त्याने एक ताईत बांधला व एका पुडीत थोडा अंगारा बांधून दिला व पुढच्या अमावास्येपर्यंत रोज सकाळी आंघोळीनंतर कपाळाला लावायला सांगितला.
संजयचे वडील त्याला परत घरी घेऊन आले. आठवड्यात संजय पूर्ण बरा झाला पण अजुनही त्याचे मित्र त्याला दुरुनच पाहत आणि तो उठला की पळून जात. बिचारे महिनाभर तरी संजयला टरकुनच होते. आता संजय पूर्णपणे मुक्त झाला आहे पण अजूनही त्या मांत्रिकाने दिलेला ताईत सतत गळ्यात बाळगतो.

मागील लेख वाचा

No comments:

Post a Comment