या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

९) माझी आई-


"स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी"
तू शिकवलेली ही ओळ अजुनही माझ्या लक्षात आहे. शाळेत असताना "माझी आई"हा निबंध पाठ असायचा पण त्याचे खरे महत्त्व तर आता कुठे कळू लागले आहे. जन्माला आल्यानंतर पहिला शब्द शिकतो तो ' आई ' आणि ठेच लागल्यानंतर ओरडतो ते ही 'आईच' लहानपणी जेवण गरम असल की तू फुंकर मारुन मगच मला द्यायची. स्वतःला कमी पडले तरी चालेल पण मला काही कमी पडू देणार नाहीस. एकदा अभ्यास घेताना तू मला म्हणालीस ,"ह्या प्रश्नाचे उत्तर दे नाही तर थोबाडात मारेन" मी ही नकळत पणे विचारले,"आई थोबाड म्हणजे काय ग?" तेव्हा तुला ही हसू फुटल होत. दहावी ला कमी गुण मिळाल्या नंतर तुझ्या डोळ्यात आलेले अश्रू आणि बारावीचा निकाल लागल्यानंतरचा तुला झालेला आनंद तर मी कधीच विसरू शकणार नाही. आता कधी कमी गुण मिळाले की तू म्हणतेस,"जाउ दे सगळे विषय तर निघाले ना !" जेव्हा कोणी माझी स्तुती करत तेव्हा मला अभिमान वाटतो मी तुझा मुलगा असल्याचा. माझ्यावरील संस्कार ही फक्त तुझीच देणगी आहे. मी कितीही लिहिले तरी तुझे आभार मी कधीच मानू शकणार नाही पण तुला आनंदी ठेवणे आणि तू माझ्यासाठी घेतलेल्या कष्टांचे चीझ करणे हेच माझ्या आयुष्याचे ध्येय असेन.