या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

४) जीवनातील एक सखी

आज या विश्वात सर्वजण यशाच्या पायरीवर चढ़त आहेत पण कधीतरी यात वेळ काढून जर आपल्या विश्वाची गणना केली तर ती "कुठे हरवले ते बालपण?" यावरच येऊन थांबते. प्रत्येक मनुष्याला या जगात काहीतरी व्हावेसे वाटते. पण आईच्या कुशीतील लहान बाळ व्हावेसे वाटते ही कल्पना किती सुखद आहे ना........... पुन्हा त्या सुखद क्षणानंच आनंद रोमारोमात भरून एक निःसंग आत्म्यात निर्मल आणि व्यापक जीवन जगून बंधनाच्या कुंपणात बंदिस्त राहण्याचा तो क्षण कोळशाच्या खाणीतून मिळणाऱ्या हिऱ्याइतकाच अभिनव असेल.

आईची ती कुशी म्हणजे वात्सल्याचा झरा, मायेची उब, प्रेमाचा गालिचा, मधुरतेचा संगम, प्रफुल्लतेचे कमल! आज व्यक्ती लहान असतो तेव्हा आई ही माता असते; तो तरुण असतो तेव्हा आई ही मैत्रीण असते आणि जेवा तो वृद्ध असतो तेव्हा आई त्याच्या जीवनाला दिशा देणारा आत्मा असते. आज जगाच्या पटात आपण उतरतो तेव्हा धोक्यांचा पाऊस वर्षाव करत असतो, संघर्षाची आग तेवत असते तेव्हा मनात येते आई गं!. जेव्हा आपण मनातून खचते तेव्हा तीच माउली स्वतःच्या पदराची छाया धरते. जेव्हा आपल्या डोळ्यात आसवे पडतात तेव्हा तीच ओंजळ धरूनच उभी असते.
लहानपणी दुःख काय असते आपल्याला माहीतच नसते कारण फलावरील कवचाप्रमाणे तिने आपल्यासमोर जरी कठोरतेचे पांघरूण घातले तरी ती आतून अगदी रसाळ आहे आणि आपण नेहमी तिची रसाळताच अनुभवत असतो.
ही एक कल्पना आहे पण ही जर सत्यात उतरली तर किती मज्जा येईल जर मला ईश्वराने पुनर्जन्म दिला तर मी त्याला बिनधास्त सांगीन की मला आईच्या कुशीतलं बाळ व्हायचं आहे.....
या जगात येतानाही आणि या जगाचा निरोप घेतानाही.........
खरंच, आई म्हणजे मनातील आत्मा आणि हृदयातील ईश्वर. काट्यांतील गुलाब आणि हर्ष्याचा पाऊस. सत्याचा उदय आणि असत्याला कायमचाच शह!
लहानपणापासून आपण आईला कधी ओळखूच शकलो नाही कारण जेव्हा जेव्हा आपण अस करायला गेलो तेव्हा स्वाती नक्षत्रातील चातकाप्रमाणे तळपतच राहिलो.
आज माझ्या या जीवनरूपी सागरातील ती राजहंस आहे.

शेवटी मला एकाच गोष्ट म्हणावीशी वाटते
त्या काली शिवाजीला घडवणारी जिजाऊ माता होती,   

अहिल्याबाई होळकरांना शिकवणारी त्यांची माता होती,

पण या काळात, 

या जीवनातल्या छोट्याश्या प्रवाहाला कलाटणी देणारी माजी आई ही एक संपूर्ण आकाशात उठून दिसणारा ताराच आहे..............