या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

२) आई

आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार
जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार
आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार

तळपत्या उन्हातन रखरखत्या रानात
राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात
कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तुला उपवास
ओल्या मातीतून चालताना तुडीविले काट्यांचे फास
आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार
नभीची चांदणी तू चंद्राची कोर
शीतल तुझी च्या मला हवी जीवनभर
तुझ्या शीतल छायेमध्ये उभे आयुष्य जगेन
आई देवापाशी मीग आई तुलाच मी मागेन