या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

६) नाते तुझे नि माझे...

नाते तुझे नि माझे
मायेच्या सावलीखाली वाढलेले,
अकुंरत्या ईवलूष्या बीजाला
तू पंखाखाली हळुवार जपलेले..
असंच एक नातं जे जिव्हाळ्याचं , प्रेमाचं अन आपुलकीचं प्रतीक मानलं जातं ते म्हणजे आईचं अन तिच्या तान्हुल्याचं. अश्याच या पवित्र नात्यावर शब्दांची फुले उधळावी तेवढी कमीच म्हणावी लागतील. नऊ महिन्याचा या खडतर प्रवासात सतत एक दर्द उरात घेऊन पोटच्या गोळ्याला जपायचं अन अखेर त्या जीवघेण्या प्रसूतिवेदनांना एका आनंदाच्या आभासाखाली हसत हसत सहन करायचं अन एका नाजूक फुलाला जन्म द्यायचा, हे सारं आपल्याला ऐकायलाच किती थरारक वाटतं, पण तुम्ही कधी विचारलं आहे त्या आईला , जिने नुकतंच एका अभ्रकाला जन्म दिलाय, तुम्हाला तिच्या चेहर्‍यावर एक विलक्षण आनंद अन मनात तिच्या दरवळलेला परमानंद दिसेल. का तिच्या चेहर्‍यावर हे सारं दिसून येतं अन का एखाद्या स्त्री ला आई होण्याचं स्वप्न बघावंस वाटतं याचा अर्थ अजून कोणालाच नाही सापडला आहे.
जगात आई-मुलाच्या नात्यापेक्षा काहीच श्रेष्ठ नाही हे आपल्यालाच माहीत आहे . " स्वामी तीनही जगांचा आईविना भिकारी " हे ते आपण खूपं पूर्वीपासून वाचत आलोय. आईच्या नात्यात एक मर्मपणा लपलेला असतो , हळव्या मनाची ती जननी अन उदार काळजाची ती देव असते. आज देवासमोर हाथ का जोडावेत अगर दैवंच आईच्या प्रेमासमोर नतमस्तक होत असेल तर. आपण पाहतोच आपल्या तोंडातून जो पाहिला शब्द बाहेर येतो तो काय असतो आ..ई. अन आई या नात्याचं महत्त्वं तर साऱ्या जगातल्या देवांना हि माहीत आहे. पुराणातली कितीतरी उदाहरणे याची साक्ष देऊन जातात. याचा अर्थ अस आहे की आईचं नातं विश्वात कायम होतं कायम आहे अन असच कायम राहिलं.
थोडक्यात सांगायचं म्हणजे आई आपला सहावा प्राण आहे , ती आपल्याला जन्म देऊन जगायला सुद्धा शिकवते. आपण कितीही मोठे होऊद्यात न तरी ती आपल्याला तिच्या तान्हुल्याचा नजरेनेच पाहत असते अन तिच्या हाताने भरवायला नेहमीच तयार असते. आई म्हणजे प्रेमाचा सागर, आई म्हणजे अमृताचा पाझर , आई म्हणजे वात्सल्याची गाय अन आई म्हणजे दुधावरची मखमली साय , आई म्हणजे फुल सुगंधाचे एक पात्र दरवळाणार्‍या अत्तराचे , आई म्हणजे सावली उन्हातली ,आई म्हणजे दिशा चुकलेल्या वाटसरूची. आई म्हणजे आभाल नक्षत्रांचं अन मग बरसणं मंद सरींचं एवढं सारं म्हणजे आईच आई .. तुझ्याशिवाय तुझ्या तान्हुल्याला कुठलीच मिठी उबदार नाही.. अश्या या आईच्या प्रेमाला अन नात्याल्या प्रत्येकाने नेहमी जपावं ...
आजकाल आपण पाहतोच आहे हे जग किती संकोचीत होतं चाललं आहे, अश्या नात्यांचे बंध अगदी धाग्या धाग्यापरी तोडले जात आहेत. कालच वाचलं वुत्तपत्रामधे की मुलाने एवढं सारं असूनही आईचा छळ केला अन तिला भीक मागण्यासाठी सोडून दिलं , तेव्हा असं वाटलं होतं की जावा सरळ अन त्या मनुष्याचा खून करावा अन त्या आईच्या समाधानासाठी अश्या क्रूर मनुष्यजातीला एकदाचा मुळांसकट उखडून टाकावं, ज्या आईने तिच्या लेकरासाठी आपल्या कातडयाचे जोडे करून त्याला चालवायला शिकवलं , डोळ्यांची खासडं होईपर्यंत त्याची दिशा होत गेली , मायेच्या हाताने आयुष्यभर कुरवाळलं त्याच हाताने तिला भीक मागायला लावली मग काय म्हणावं अश्या या नात्याचा घात करणार्‍या मुलाला तुम्हीच उत्तर द्या आता ?
मला एवढंच म्हणायचा आहे ज्या आईने आपल्या जिवाचं रान करून आयुष्याचं दान तुमच्या झोळीत टाकलं अन तुम्हाला लहानाचं मोठं केलं , तुमच्या आयुष्याच सोनं केलं तिची अशी अवहेलना कशासाठी? अश्या या नात्याला एका नवीनं नात्यासाठी क्षणात अलग करतात कशासाठी.. ?
मला माझ्या या निःस्वार्थी,निर्विकार नात्यावर खूप अभिमान आहे अन माझ्या आईसाठी मृत्युसमोरही माझी मान ताठ आहे.