या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

१) आई माझी

आई माझी मायेचा झरा

जसा आकाशीचा तेजस्वी तारा

सागराला जसा लाभला किनारा

आई माझी….

 

आई माझी प्रेमाचा पाझर

कृपाळू आगर, दयेचा सागर

आई माझी….

 

किती सोसल्या यातना

करुनी मोठ्या मना

तरीही सदा आनंदी

आई माझी….

 

जन्मो जन्मी मज

लाभो तुझी कूस

होई कासावीस, माझ्याविना

आई माझी….

 

आई माझी साउली

कल्पतरू माउली

असी माझी माय

दुधावरची साय

जसी वासाराविना गाय

आई माझी….

 

काय वर्णू माझ्या आईची महती

शब्दात हि न उतरे असी तिची व्याप्ती

सदा ठेवी हात मायेचा माथी

असी माझी माय

आई माझी…