या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

१९)आई-बाबा तुमच्यासाठी.

ही कविता त्याने आई-बाबांच्या चरणी अर्पण केली आहे.

" आज "

माझ्यात शोधिले मला मी आज
कोण आहे मी समजतात वाटते आहे लाज
शोधिले कसा मी घडलो
पाहिले कुठे कमी पडलो
आई-बाबानी जन्म दिला
माझ्यासाठी हाताचा पालना केला
पोशिले मज सर्व संकटा करुनी मात
माझ्याचसाठी जगले दिनरात
भरवला आजपर्यंत सुखाचा घास
जीवासाठी माझ्या ते घेतात श्वास
दुःख सारी बाजूला ठेवून
नेहमीच आलेत सुखाचा पाउस घेवून
मी मात्र चुकलेलो वाट
वाईट मार्गांचा चढणार होतो घाट
पण माझ्यात शोधिले मला मी आज
कोण आहे मी समजतात वाटते आहे लाज
मी आहे काठी आई-बाबांच्या म्हातारपनाची,
सुरेख मार्ग निवडला आज करुन सवारी मनाची
मी आहे त्यांचे तान्हे बाल
ज्यांनी पाहिले स्वप्न माझे गोड एकेकाल
आज त्यांच्याचसाठी फ़क्त माझ जगण
बंद केल मी आज चुकीच वागन
हे ईश्वरा, आता तुला एकच मागन
शिकव मला रात्रीच त्यांच्यासाठी जागन.