या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल अापले मनपूर्वक स्वागत या शैक्षणिक वेबसाईट विषयी इतरांना सांगा व आपणही या वेबसाईटला नियमितपणे भेट देत रहा धन्यवाद.

२१)तू नसतीस तर .....

आभालातुन फुटल्या पहिल्या वहिल्याच,
किरनाच्या कपालीची रेखा-
असलीच तर असेल माहीत नाही फ़क्त आभालाला !
त्या "आभालासारखी" तू .......

ओंकाराचे सत्वसुरसुधा केव्हातरी असतीलच
राहिले कोंडून एखाद्या स्वप्नशील गर्भात!
त्या समर्थ गर्भाची अधिकारी तू .....

असतात उद्याची रंग-गंधमय फूले
ज्या कलीकलीतुन पाकल्या अवगुनथुन
त्या अफुत कल्याना तरेल स्पर्शाने जागविनारया
शरदाच्या दहीवरल्या 'पहाटवार्याची झुलुक' तू ....

जे इथे 'जगले' त्या सार्याचीच
'पायधुल' मस्तकी झेलताना
धुलिचेच 'भूषण' माननार्या
सर्वोदार 'धरित्रीसारखी' तू.....

जिच्या 'पायठशावर' उमटत जातात
साहित्य,संगीत नृत्य -नाट्य अशा
ललिताकलांची जीवनदायी राउळ
त्या 'मयूरस्पर्शी' सरस्वतीची लाडकी लेकच तू .....

वाहत्या गंगेला 'वाह्न्यतला' अर्थवाही आनंद सांगणारी
हिमालयाच्या उन्चेपनाची ऊँची पचवायला कानात पटवीनारी,
जलतानाही जगाला उजलन्याचा महामंत्र तापदेवाला देणारी,

केवल तूच !! "तू -तू नसतीस तर ?"

या प्रश्नातच आहे तू असण्याचे निविर्वाद उत्तर !
कारण माझ्यासाठीच नव्हे- सर्वासाठी-
तू नाहीस केवल एक व्यक्ति वा एक जीव-
तू आहेस एक अतीतापासून अनागताप्रयन्तचे तत्व
ज्याचे एकमेव नाव आहे- असू शकते.....

आई!!